रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (23:34 IST)

अमरावती उमेश कोल्हे हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला पोलिसांनी अटक केली

arrest
महाराष्ट्रातील अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. यासह उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान शेख रहीम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे 22 वर्षीय मुदस्सीर अहमद, 25 वर्षीय शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक 24, शोएब खान 22, अतिब रशीद 22 आणि युसुफकान बहादूर खान 44 अशी आहेत. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून अमरावतीच्या मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी इरफान हा एक एनजीओ चालवतो त्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश मारेकरींना दिले होते. त्याच्या आदेशानुसारच उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती.