शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (22:00 IST)

वटपौर्णिमे निमित्ताने सुप्रिया सुळेंचा खास उखाणा

supriya sule
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही वटपौर्णिमेची पुजा केली आहे. यावेळी त्यांनी एक खास उखाणा घेतला. या उखाण्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
 
भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पती असलेले महिला मंगळागौरीपासून तर शेवटपर्यंत सण साजरे करतात. मात्र, विधवासाठी कुठलाही सण समारंभ नसतो. याच परंपरेला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अमरावती येथे महिलांचे सोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा अमरावतीत पाडला आहे. सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करत केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी त्यांनी खास उखाणा सुद्धा घेतला. ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास, असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला.