मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 31 मे 2022 (22:45 IST)

तर त्यांनी संभाजीराजेंना उमेदवारी का दिली नाही ?सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

sanjay raut
महाविकास आघाडीने सरकारने आपला निम्मा कालावधी पूर्ण केला आहे. अशातच राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे आणि मनसे नेते गजानन काळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगल्या आहेत. परंतु, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आणि हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत  यांनी केले आहे.
 
सुप्रिया सुळे या तुळजापुरात देवीचे दर्शन घेत असताना पुजाऱ्यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होऊ दे, पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडण्यासाठी तुळजापूरमध्ये येऊ, असे साकडे सुळे यांच्या देखत देवी चरणी घातले. यावरुन आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा रंगली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. आणि हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असेच सुप्रियाताईंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोकं निर्माण करत असतात. राज्यात मविआचं सरकार असून याचे नेतृत्व मुख्यमंत्री करत आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे हा प्रश्न ज्यांनी निर्माण केला. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.