राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत

ransom
Last Modified बुधवार, 2 जून 2021 (08:07 IST)
नागपूरमधील काँग्रेस नेते त्रिशरण सहारे यांना खंडणी प्रकरणात नागपूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. कामाठीमधील भू-माफिया रंजीत सफेलकरच्या सोबत झालेला आर्थिक व्यवहार पुढे आणू नये यासाठी विश्वजित किरदत्त यांना एक लाखाची खंडणी मागण्यात आली होती. ती घेताना त्रिशरण सहारे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, कुख्यात रंजीत सफेलकर याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याशी संबंधित प्रकरणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यादरम्यान रंजीत सफेलकरच्या बँक खात्याची देखील चौकशी करण्यात आली. त्याच्या खात्यांच्या चौकशीमध्ये पोलिसांना समजलं की, सुमारे चार वर्षापूर्वी त्याच्या उमरेड रोडवरील टेमसना गावाजवळच्या 15 एकर शेतीची रक्कम सफेलकरच्या बँक खात्यातून राजघराण्यातील सदस्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली आहे.
या बातमीचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सहारे यांनी राजघराण्यातील एका सदस्याला रंजीतबरोबरच्या फोटोवरुन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगला वैतागून या सदस्याने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीत समोर आले की, बंडू सहारे नावाच्या व्यक्तीने राजघराण्यातील व्यक्तीशी संपर्क साधला होता. तेव्हापासून ते ब्लॅकमेल करत होते. रंजीतसोबत असलेला फोटो छापल्यास बदनामी होईल अशी धमकी देत, फोटो न छापण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
भोसले राजघराण्याशी संबंधित असलेल्या विश्वजित किरदत्त यांच्यासोबत राकेश गुप्ता, ॲड. प्रकाश जयस्वाल आणि दुनेश्वर पेठे यांच्या नावे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा सौदा केला होता. या सौद्यापोटी विश्वजित आणि त्यांच्याशी (राजघराण्यातील) संबंधित व्यक्तींच्या खात्यात लाखोंची रक्कम जमा झाली. ही रक्कम गँगस्टर रणजित सफेलकर याच्या बँक खात्यातून वळती करण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे.
थेट राजघराण्याला ब्लॅकमेल करण्याचं हे प्रकरण पोलिसांनी गांर्भीर्याने घेतलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे आरोप लागलेल्या त्रिशरण सहारेला पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून मेयो रुग्णालय चौकातून रंगेहाथ अटक केली. एका काँग्रेस नेत्याला थेट राजघराण्याच्या लोकांना ब्लॅकमेल करण्याच्या या प्रकरणावर सध्या काँग्रेसने मौन साधलं आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने केली.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Jio Platformsचा निव्वळ नफा 3728 कोटी रुपयांवर पोहोचला

Jio Platformsचा निव्वळ नफा 3728 कोटी रुपयांवर पोहोचला
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत जिओ प्लॅटफॉर्मचा एकत्रित निव्वळ नफा 23.48 ...

रिलायन्सच्या निकालांवर कंपनीचे अध्यक्ष श्री मुकेश अंबानी ...

रिलायन्सच्या निकालांवर कंपनीचे अध्यक्ष श्री मुकेश अंबानी यांची टिप्पणी
दिवाळीपूर्वी, आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपण कोविड साथीच्या आजारातून लवकरच ...

Fixed Deposit: जर तुम्ही बँकेत FD करत असाल, तर या 4 गोष्टी ...

Fixed Deposit: जर तुम्ही बँकेत FD करत असाल, तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा
मुदत ठेवींना दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. साधारणपणे लोक FD मध्ये गुंतवणूक ...

Paytm चा IPO मंजूर, गुंतवणूकदारांना मिळणार संधी कमवण्याची!

Paytm चा IPO मंजूर, गुंतवणूकदारांना मिळणार संधी कमवण्याची!
शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीने पेटीएमच्या आयपीओला मान्यता दिली आहे. ब्लूमबर्गच्या ...

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या ...

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य ...