शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (12:05 IST)

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

माजी खासदार व माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा एकनाथजी गायकवाड यांचं सकाळी 10.00 वाजता कोरोना मुळे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.
 
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. लोकसभेचे माजी सभापती आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा त्यांनी पराभव केला होता.
 
काँग्रेसकडून ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले. ते 14आणि 15व्या लोकसभेचे खासदार होते. 2014 मध्ये गायकवाड यांनी मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवली. शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांना नमवलं होतं. गायकवाड धारावी मतदारसंघातून तीनवेळा आमदार निवडून आले होते. त्यांनी दोनवेळा राज्याचं कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं.