1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (08:39 IST)

सिन्नर मधील चार कॅफेवर पोलिसांचा छापा; छाप्यात ना दिसला चहा, ना कॉफी तर मिळाले

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर जसे त्याच्या औद्योगिक वसाहतीसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे तेथे चालणाऱ्या अवैध कामामुळे ही प्रसिद्ध होतो की काय, असे स्थानिक नागरिकांना वाटायला लागले आहे.
 
सिन्नर सारख्या विकसनशील शहरातील तरुणाई कुठल्या दिशेने आपले आयुष्य घेऊन जात आहे याचे भयानक वास्तव नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने उध्वस्त केलेल्या कॅफेतून उघड झाले आहे.
 
सिन्नरच्या सांगळे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या या कॅफेत तरुण तरुणी अश्लील चाळे करीत असल्याची गुप्त माहिती हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यावरून या ठिकाणी छापा टाकला असता या कॅफेत ना चहा, ना कॉफी, ना ग्लास दिसले… आढळले फक्त बादली भर निरोध.
 
कारवाईमुळे कॅफेच्या आडून सुरु असलेल्या बदफैली धंद्याचे कुटील रूप सिन्नरच्या वेशीवर टांगले गेले आहे. आठवण कॅफे, रिलेक्स कॅफे, व्हाट्स अँप कॅफे, चौदा चौक वाडा सांगळे कॅाम्प्लेक्स सिन्नर, हर्ट बिट कॅफे सिन्नर बसस्टॅड समोर या ठिकाणी ही छापेमारी झाली. हे कॅफे भर वस्तीत चालू असताना स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती नसल्याचे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
 
या कारवाईचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी स्वागत तर केलेच शिवाय तमाम सिन्नरकर जनता देखील पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.
 
"या" कॅफे मालकांना घेतले ताब्यात
१ संतोष नंगु चव्हाण
२ सागर काळुंगे
३ सुमित सुनिल बोडके
४ ओम राजेंद्र जगताप (सर्व रा. सिन्नर)
 



Edited By -  Ratnadeep ranshoor