सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (13:27 IST)

Student Insurance scheme: राज्य सरकार कडून विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर

shinde panwar fadnavis
Student Insurance scheme:राज्य सरकार कडून विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना जाहीर करण्यात आली असून ही योजना शाळकरी मुलं आणि पदवी पर्यंतच्या शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच सरकारी किंवा अनुदानित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.  ही विमा योजना एका वर्षासाठी लागू असेल. 

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 16 ऑक्टोबर रोजी या बाबत राज्य सरकारचा निर्णय जारी केला आहे. विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या योजनेत वैद्यकीय तसेच अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे. 20 रुपये प्रीमियम भरून एका विद्यार्थ्याला एक लाखाचे वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळेल.

62 रुपये प्रीमियममध्ये याच कालावधीसाठी 5 लाख रुपये कव्हरेज मिळेल.अपघातांनंतर उपचारासाठी 2 लाख रुपयां पर्यंतचे मेडिकल कव्हरेज मिळवण्यासाठी 422 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. असं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. 

या योजनेसाठी प्राथमिक विमा साठी पात्र विद्यार्थी महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत संलग्न, संबद्ध, वर्गीकृत महाविद्यालयात, संस्थेत, किंवा विद्यापीठात शिकणारा असावा. 

तर सेकेंडरी विमा साठी पात्र सदस्य हा विद्यार्थ्याच्या प्रवेश अर्जावर नोंदणी केलेला पालक असणार .
या विमा योजनेसाठी ICICI Lombard इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड यांची निवड केली असून 20 आणि 422 रुपयांचे प्रीमियम असणारी योजना ICICI ची असणार. तर 62 रुपये प्रीमियम असून पाच लाखाचा अपघाती विमा नॅशनल इन्शुरन्स कॉर्परेशन लिमिटेड कंपनीचा आहे. 
 
कोणाला विमा संरक्षण मिळणार नाही- 
आत्महत्या करणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, मोटार रॅली किंवा साहसी खेळात सहभाग करणे, गर्भधारणा, बाळंतपणा, दहशतवादी हल्ले, दारूच्या व्यसनामुळे झालेला अपघात, ड्रग्स आणि अम्लीय पदार्थांचे सेवन करणे, गुन्हेगारी, आणि न्यूकिलर रेडिएशन च्या घटनांध्ये विमा संरक्षण मिळणार नाही. 
 
 Edited by - Priya Dixit