मानकापूर गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना अटक
नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे परिसरात दुकानाच्या जागेवरून झालेल्या वादात भाजी विक्रेतांची हत्या करण्यात आली. तर मयताच्या मित्र गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
मंगळवारी रात्री 10.15 वाजताच्या सुमारास, आठवडी बाजार सुरू असताना, सोहेलचा नंदू जयस्वाल आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीशी दुकान उभारण्याच्या जागेवरून वाद झाला. या वादानंतर आरोपींनी सोहेलला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुरुवारी रात्री आरोपींनी मयत सोहेलवर गोळीबार करून चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली. या प्रकरणात सोहेलचा मित्र जखमी झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हेगारीचे रेकॉर्ड आहे. या हल्ल्यात 2 रिव्हॉल्वर वापरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 4 राउंड गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी आरोपींकडून रिव्हॉल्व्हरसह तीन घटक शस्त्रे जप्त केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit