सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि आपण घेणार: उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेत शिवसेनशी युती व्हावी यासाठी भाजप सकारात्मक असून आम्ही शिवसेना तसे आमंत्रण द्याचे ठरवले आहे. असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. मात्र, युतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण घेणार, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
युती करायचीच असेल तर ती लवकर व्हायला हवी, अन्यथा निवडणुका होऊन जातील, अशी भावना दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यांनी जाहिरपणे मांडलेल्या या भूमिकेला भाजपकडून प्रतिसाद मिळेल, असे बोलले जात होते. त्यानुसार भाजपने शिवसेनाला युतीच्या चर्चेसाठी आमंत्रण देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचया उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.