1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Praniti Shinde targets Rohit Pawar saying that let some days pass maturity will come between them

काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर निशाणा

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया विचारली प्रणिती शिंदे म्हणाल्या की, कोण रोहित पवार? रोहित पवारांची ही पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं म्हणत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
 
सोलापूर लोकसभेच्या जागेवरुन आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की, राष्ट्रवादी लढणार याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करत आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू, असं म्हटलं होतं. मात्र, यावेळी प्रणिती शिंदेंनी पोरकटपणा म्हणत रोहित पवारांवर थेट पलटवार केला आहे.
 
प्रणिती शिंदे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. महिला आमदारच सुरक्षित नसतील तर, सर्वसामान्य महिलांना सुरक्षा कशी मिळणार, असा सवालही शिंदेंनी यावेळी उपस्थित केला.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
नरेंद्र मोदींची बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला उपस्थिती 2 वंदे भारत एक्स्प्रेसचंही उद्घाटन