सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (17:26 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिर: ज्योतिर्लिंगाभोवती बर्फाचा गोळा, शिवभक्त यांची फसवणूक काय आहे पूर्ण प्रकरण वाचा पूर्ण रिपोर्ट

trayamkeshwar
त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या ज्योतिर्लिंगाभोवती बर्फाचा गोळा आढळून आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्या व्हिडिओची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा झाली होती. भाविक भक्त अमरनाथ बाबाचा आशिर्वाद या भावनेने या घटनेकडे पाहत होते. दरम्यान आता या व्हिडिओ मागील सत्य आता समोर आले आहे आणि हे सत्य अत्यंत खळबळजनक आहे.याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती आणि चौकशीनंतर हा बर्फ काही पुजाऱ्यांनीच हा बर्फ येथे आणून टाकल्याचे उघड झाले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर नगरीत त्यासोबतच भाविक संताप व्यक्त करत आहेत. प्रकरणाच्या चौकशीनंतर भाविकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या तीन पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ :-
शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय ठरला होता. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याचा निर्वाळा घेऊन सत्य परिस्थिती पडताळून पाहिली. त्यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली.
 
या समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. समितीच्या अहवालानंतर तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रश्वी आसराम यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुजारी सुशांत यांनी स्वत: पिशवीत बर्फ नेऊन ते पिंडीवर ठेवल्याचे व त्यावर बेलपत्र ठेऊन त्याचे व्हिडीओ काढून ते व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले होते
 
त्या घटनेला आठ ते नऊ महिने उलटून गेले आहे. ३० जून २०२२ रोजी ही घटना समोर आली होती. दरम्यान या घटनेमागील सत्य समोर आले आहे. हे सत्य उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली आहे आणि संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता दावा
हा व्हिडिओ समोर आला असता तो खोटा असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. चौकशी अंती हा दावा खरा ठरला असल्याचे समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तीन पुजाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाभोवती अमरनाथ प्रमाणे बर्फ झाल्याचे सांगत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची जोरदार चर्चा समाज माध्यमांवर झाली होती.
trayamkeshwar
सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली
हा व्हिडिओ समोर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानुसार सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली त्यात एका पुजाऱ्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा बर्फाचा गोळा शिवपिंडीभोवती आणून ठेवल्याचे तपासात समोर आले. सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. त्यामुळे .दूध का दूध, बर्फाचा बर्फ’ झाला आहे.
 
खरंतर अमरनाथ आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणांची वातावरणाची परिस्थिती अत्यंत भिन्न आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथील हवामान पाहता असं काही होणं अशक्य असल्याचं वर्तवले जात होतं. त्यामुळे संशय दाट होत होता. हा संशय अखेर खरा ठरला आहे.
 
त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार :---
त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत खोटा प्रचार केला म्हणून सुशांत तुंगार तसेच त्याला मदत करणारे आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर कलम ५०५ (३), ४१७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथे या बर्फ प्रकरणानंतर चर्चांना ऊत आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही चौकशी करून संबंधितांवर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शहरातील एकाही ज्येष्ठाने त्यांच्या संपूर्ण हयातीत शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचे पाहिले वा ऐकले नव्हते. गाभाऱ्यातील तापमान लक्षात घेता बर्फ तयार होणे शक्य नसताना, हा प्रकार नेमका कसा घडला असावा, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
 
 त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत
त्र्यंबकेश्वर  हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
 
 हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. [२] मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
 
 "गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥ 
 
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.
 
धार्मिक विधी आणि पूजा
त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे च केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.
Edited by : Ratnadeep Ranshoor