शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (15:50 IST)

नाशिकचे प्रशांत डबरी, डॉ. सुभाष पवार, महेंद्र छोरिया झाले आयर्नमॅन

Prashant Dabri of Nashik
नाशिकच्या आणखी तीन जणांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. या तीन विजेत्यांमध्ये भगर उद्योगक महेंद्र छोरिया, प्रशांत डबरी आणि डॉ. सुभाष पवार यांचे समावेश आहे. डॉ. पवार यांनी वयाच्या ६६व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा जिंकून नवा आदर्श निर्माण केला आहे.
छोरिया आणि डबरी यांनी दक्षिण अफ्रिकेतील अतिशय खडतर अशी आयर्नमॅन स्पर्धा विहीत वेळेच्या आधीच पूर्ण केली आहे. तर, डॉ. पवार यांनी मेक्सिकोत आयर्नमॅन होण्याचा मान पटकावला आहे. सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंग अशा तीन टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होते. अतिशय खडतर आणि शारीरीक क्षमतेची कसोटी पाहणारी ही स्पर्धा असते. जगभरातून अनेक खेळाडू या स्पर्धेत येतात. त्यातील मोजक्या जणांनाच ती विहीत वेळेत पूर्ण करणे शक्य होते. यापूर्वीही नाशिकच्या काही मान्यवरांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे. आता एकाचवेळी ३ जण आयर्नमॅन झाले आहेत. छोरिया हे दुसऱ्यांना आयर्नमॅन बनले आहेत.