1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (08:19 IST)

प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त

पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची सुमारे ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. पीएमसी बँक घोटाळ्यात ४ हजार ३३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास करीत आरोपींची धरपकड सुरू केली.
 
पुढे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेल्याने ईडीने या घोटाळ्याचा पुढील तपास सुरू केला. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असताना, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची माहिती समोर आली.
 
ईडीच्या चौकशीत असे समोर आले की, राऊतने षडयंत्र करत ९५ कोटींची फेरफार केला. यात, पीएमसी बँकेकडून एचडीआयएलने घेतलेले कर्ज, ॲडव्हान्सचा स्रोतही बेकायदेशीर होता. प्रवीण राऊत यांना दिलेल्या पेमेंट्सच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे / करार मिळून आले नाहीत. एचडीआयएलकडून पालघर परिसरातील जमीन खरेदी करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचे समाेर आले.