मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जानेवारी 2021 (08:13 IST)

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो

The Shiv Sena remembers
औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. 
 
औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.