शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (18:04 IST)

मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गात

मेळघातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोलीतच मुख्याध्यापक दारू पिऊन झोपलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला आहे.  विद्यार्थ्यांनी या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ काढला (Videos) असून वर्गखोली बाहेरच शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर लघुशंका केल्याचेही पाहायला मिळाले आहे. अविनाश राजनकर असं मद्यप्राशन केलेल्या मुख्याध्यापकाचे नावं असून अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे तसेच दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाईसाठी जिल्हा परिषद सीईओकडे ग्रामस्थांनी तक्रार केल्याची माहिती आहे. 
Edited by : Smita Joshi