बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (12:26 IST)

इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम

students
इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असण्याचे सांगण्यात येत आहे. हा नवीन नियम पुढील वर्षांपासून 2023 लागू करण्यात येणार आहे. 
 
हा नियम येत्या मार्च 2023 परीक्षेसाठी लागू होणार आहे. शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले पत्रकानुसार, या संदर्भात सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना देण्यात आले आहे. दहावी आणि बारावी विध्यार्थ्यांना किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षेला बसू देणार नाही. शाळा चुकवणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्याचा मोठा फटका बसणार आहे. दहावी -बारावीच्या विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असल्याची सूचना शिक्षण विभागाने शाळा , महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना दिली असून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे.  
 
Edited by - Priya Dixit