बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कराड , शनिवार, 12 मे 2018 (15:27 IST)

मुख्यमंत्री मर्जीतले लोक नेमून क्लीन चिट देतात : चव्हाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत. चौकशीचे नाटक केले जाते आणि लोक विसरले की, मुख्यमंत्री त्यांना क्लीन चीट देतात. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तरी दिली जात नाही. माझ्यासारख्या एका माजी मुख्यमंत्र्याला माहिती दिली जात नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काय दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित करत याप्रश्नी न्यायालयात धाव घेण्याची विनंती आपण पक्षाकडे केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.