बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 12 मे 2018 (15:23 IST)

पवारांचा भुजबळांना सल्ला, तब्येतीची काळजी घ्या

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी भुजबळांना आराम करण्याचा सल्ला दिला. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली, पण त्याचा तपशील कळू शकला नाही.
 
जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. गुरुवारी भुजबळांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर भुजबळांनी शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तब्बल दोन वर्षानंतर भुजबळांनी पवार यांची भेट घेतल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोन्ही नेत्यांध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत भुजबळांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र वडीलकीच्या नात्याने पवारांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे भुजबळांनी आवर्जुन सांगितले.