शिर्डी शेजारील ह्या तालुक्यात रविवारपासून जनता संचारबंदी !

janta curfew
Last Modified रविवार, 9 मे 2021 (13:12 IST)
शिर्डी शेजारी असलेल्या अहमदनगर येथील महत्वाच्या कोपरगाव शहरासह तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे रविवार दि. ९ मे दुपारी ३ ते शनिवार दि. १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात जनता संचारबंदीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली.
पत्रकात वहाडणे यांनी म्हटले, की गेल्या आठवड्यात सात दिवसांचा जनता कफ्र्यू पार पाडल्यानंतर शनिवार, रविवार दोन दिवस जनता कफ्र्यूला विश्रांती देण्यात येऊन पुन्हा सात दिवसांचा जनता कफ्र्यू घोषित करण्यात आला आहे.

शनिवार दि. ८ मे व रविवार दि. ९ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत जीवनावश्यक बाबींबरोबरच किराणा व भाजीपाला- फळांची विक्रीही सुरू राहणार आहे. भाजीपाला- फळांची विक्री फक्त बाजार ओट्यावर- बाजारतळ येथेच करता येणार आहे.
व्यवस्थित नियोजन व्हावे, रस्त्यात अडथळा होऊ नये, बेसुमार गर्दी होऊन कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्यच आहे. शनिवारी व रविवारी सकाळी ७ वाजता आपण इंदिरा शॉपिंगजवळ एकत्र जमावे.

रविवार दि. ९ मे दुपारी ३ ते शनिवार दि.१५ मे सकाळी ७ पर्यंत जनता संचारबंदी यशस्वी करायची आहे. आपापल्या प्रभागात कुणीही रस्त्यावर येऊ नये, संचारबंदीचे नियम पाळावेत यासाठीही आपण प्रयत्न करावेत.
कारण कोरोनाच्या संकटात रात्रंदिवस काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना आपल्या सहकार्याची गरज आहे. तसे केले तरच कोरोनाचा प्रभाव कमी करता येणार आहे. या काळात किराणा दुकाने व भाजीपाला विक्रीही बंद राहणार आहे.

दूध विक्रेत्यांना एका जागी उभे राहून विक्री करता येणार नाही; मात्र औषध दुकाने, दवाखाने व रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार असली, तरीही दुकानात औषधे वगळता इतर वस्तू विकता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात
कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

आर्यन खानचा जामीन फेटाळताना कोर्टानं दिली ही 7 कारणं

आर्यन खानचा जामीन फेटाळताना कोर्टानं दिली ही 7 कारणं
आर्यन खानचा जामीन अर्ज मुंबईच्या सेशन्स कोर्टाने आज (20 ऑक्टोबर) फेटाळून लागलाय.

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ...

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती
देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची ...

राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात दीड हजार नवे रुग्ण, अडीच हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात ...

संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी ...

संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ...