शनिवार, 21 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (08:09 IST)

पुणे-हरंगुळ इंंटरसीटी रेल्वे होणार सुरु

train
पुणे – हरंगुळ – पुणे इंटरसिटी रेल्वे दि. १० ऑक्टोबरपासून दररोज सुरु होणार आहे. या इंटरसिटी रेल्वेमुळे लातूरहून पुण्याला आणि पुण्याहून लातूरला येणा-या प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच या रेल्वेमुळे धाराशिव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाही फायदा मिळणार आहे. ही इंटरसिटी रेल्वे डिसेंबर महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे.
 
लातूर हे व्यापारी तसेच शैक्षणिक शहर आहे. त्यामुळे लातूरहून पुण्याला जाणारे आणि पुण्याहून परत लातूरला येणा-या प्रवाशांची खुप मोठी संख्या आहे. लातूर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सुरु करावी, अशी लातूरच्या रेल्वे प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आता पुणे-हरंगुळ-पूणे इंटरसिटी रेल्वे मंगळवारपासून सूरु होणार असल्यामुळे पुण्याला जाणा-या व पुण्याहून परत लातूरला येणा-या प्रवाशांची सोय होणार आहे. ही रेल्वे तीन महिने म्हणजेच येत्या डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. रेल्व विभागाकडून नवीन रेल्वे सुरु करीत असताना तीन महिन्यासाठीच सुरु केली जाते. सुरु केलेल्या रेल्वेला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद पाहूण ती रेल्वे नियमित करण्यात येत असते.
 
पुणे-हरंगुळ-पुणे या इंटरसिटी रेल्वेचे वेळापत्रक असे आहे. सकाळी ६:१० वाजता पुण्याहून रेल्वे लातूरला रवाना होईल आणि दुपारी १२:१० वाजता हरंगुळ रेल्वे स्टेशनला पोहोचेल. तसेच दुपारी ३ वाजता लातूरहून पुण्याला रवाना होईल आणि रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचेल.