बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (16:04 IST)

पुणे येथे डॉक्टरांनी 19 वर्षीय मुलीच्या छातीमधून तब्बल 2 किलोची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली

DPU Private Super Specialty Hospital
डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील डॉक्टरांनी नुकतीच एक दुर्मिळ शस्त्रक्रिया केली, ज्यामध्ये त्यांनी एका १९ वर्षांच्या मुलीच्या छातीमधून यशस्वीपणे एक २ किलो वजनाची गाठ काढली. छातीच्या मध्यभागी असलेली ही गाठ मेडियास्टिनल टेराटोमा होती, जी दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी वाढत होती, हे एक दुर्मिळ प्रकरण असून, ते विशेषत: तरुण लोकांमध्ये आढळते. या गाठीचे वजन तब्बल २ किलो आणि आकार १६ सेमी x १५ सेमी एवढा होता. 
 
जेंव्हा मुलीच्या छातीत दुखायला लागले, जडपणा जाणवायला लागला आणि अधूनमधून श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला तेंव्हा ही समस्या समोर आली. त्यावेळी त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवल्या नंतर त्यांनी छातीचे एक्स-रे काढले, निरीक्षणानंतर असे लक्षात आले की, तिच्या छातीत एक मांसपेशींचा गोळा असल्याचे लक्षात आले. सीटी स्कॅनद्वारे अधिक तपासणी केल्यावर, छातीत मध्यभागी मोठ्या प्रमाणात एक जड गाठ तयार झाल्याचे आढळले. या अवस्थेत रुग्णाला डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथे दाखल करण्यात आले.   
 
रुग्णालयात दाखल केल्यावर, छातीत तयार झालेल्या गाठीचे स्वरूप समजून घेण्यासाठी सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये, गाठ सीटी स्कॅन द्वारे पाहिले जाते, आणि तपासणीसाठी पेशींचे नमुने घेण्यासाठी त्याच्या आत एक सुई घातली जाते. यामध्ये तयार झालेल्या पेशींच्या गाठीला टेराटोमा म्हणून ओळखले जाते, हे एक भ्रूणशास्त्रीय दोष आहे जे सामान्यतः जन्म दोष म्हणून ओळखले जाते, जे वयानुसार वाढते आणि लहान वयात ओळखणे अत्यंत कठीण असते. तथापि, नंतरच्या प्रक्रियेमध्ये, या गाठीच्या वाढीमुळे जवळच्या अवयवांवर दबाव निर्माण होतो, त्यामुळे आरोग्य विषय बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. 
 
एकूणच शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची होती कारण ही गाठीची निर्मिती हृदय, फुफ्फुसे आणि छातीतून जाणार्‍या प्रमुख रक्तवाहिन्यांना संकुचित करत होती. ऍनेस्थेसिया प्रक्रिया आव्हानात्मक होती कारण गाठ श्वास नलिकेला ढकलत होती, ज्यामुळे रुग्णाला भूल देणे कठीण होते. तेंव्हा हृदय व छातीच्या शल्यचिकित्सकाची मदत घेतली. सदर शस्त्रकिया अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती, यात रक्तस्त्राव सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला. ६ तासांच्या प्रक्रियेनंतर, गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले. 
doctor
छातीतील सर्व गाठींमध्ये प्रमाण १% आहे, विशेषत: अवघ्या १९ वर्षीय मुलीवर केलेली ही दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे. जी डॉक्टरांसाठी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर २ दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि ६ व्या दिवशी रोजी डिस्चार्ज देण्यात आले.  
 
यावर भाष्य करताना डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “गुंतागुंतीची आरोग्य परिस्थिती आणि अशा स्वरूपाच्या योग्य उपचार करणारी अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांद्वारे आरोग्य सेवा सुधारणे हे माझे ध्येय आहे. ही एक संस्था म्हणून आमच्यासाठी मोठे यश आहे आणि या शस्त्रक्रियेच्या यशाबद्दल मी सहभागी सर्व तज्ञ डॉक्टरांचे मनापासून अभिनंदन करते.”
 
डॉ.यशराज पाटील, विश्वस्त व खजिनदार, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांनी सांगितले की, “ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मी तज्ञ डॉक्टरांचा आभारी आहे आणि त्यांचे अभिनंदन करतो. विविध गंभीर उपचारांसाठी उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे आणि हे प्रकरण त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”  
 
डॉ. मनीषा करमरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीपीयू  प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, म्हणाल्या, “आम्ही आमच्या रुग्णालयांध्ये उत्तम वैद्यकीय सेवा, पायाभूत सुविधा आणि उत्तम तज्ञ डॉक्टरांसह सुसज्ज आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडीने जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा विकसित करणे आणि आमच्या रुग्णांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आणि हे प्रकरण त्याचेच एक प्रतीक आहे.”
 
डॉ. समीर गुप्ता, कँसर शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणाले, “अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत यश मिळवणे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. लहान वयात असताना अशाप्रकारची गुंतागुंत शोधणे असामान्य आहे, कारण अशा घटनांचे प्रमाण दुर्मिळ आहे. डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील उत्तम आधुनिक वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधा प्रदान करते, ज्यामुळे अशा शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे पार पाडण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम सुविधा मिळतात.”
Edited by :Ganesh Sakpal