मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुणे भिंत कोसळून १५ ठार, नातेवाइकांना पाच लाख मदत तर चौकशीचे आदेश

पुणे येथील  कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस  इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू  झाल्याची दुर्घटना घडली आहे. या प्रकरणी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून, पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. 
 
दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्देय सरकारने दिले आहेत. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे असे देखील  मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुणे दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.