रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (10:10 IST)

राहुल गांधींचं ट्विटर अकाऊंट निलंबित?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट निलंबित केल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मात्र, ट्विटरनं स्पष्टीकरण दिलंय की, राहुल गांधींचं अकाऊंट निलंबित करण्यात आलं नाही,अकाऊंट सेवेत आहे.

राहुल गांधींचं एक ट्वीट ट्विटरनं हटवलं होतं. राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या 9 वर्षीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती, त्याचे फोटो या ट्वीटमध्ये होते.ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हणत ट्विटरनं राहुल गांधींचं हे ट्वीट हटवलं होतं.

राहुल गांधींचं अकाऊंट निलंबित झालं नसल्याचं ट्विटर म्हणत असलं तरी काँग्रेसनं त्यांच्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करून सांगितलंय की, "राहुल गांधी यांचं अकाऊंट निलंबित झालंय आणि ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू होईपर्यंत राहुल गांधी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लोकांशी संपर्कात राहीतल, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.
 
5) काँग्रेसच्या वर्धापन दिनी शिवाजी पार्कात राहुल गांधींची सभा होणार
काँग्रेसच्या वर्धापन दिनी (28 डिसेंबर) शिवाजी पार्कात राहुल गांधी यांची सभा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर ही सभा होणार आहे. त्यात काँग्रेस मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलंय. त्यामुळे या सभेचं महत्त्वं वाढलं आहे.
 
राहुल गांधी यांच्या सभेची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
 
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी मुंबईत येणार असल्याची माहिती दिली होती.
 
शिवसेना आणि मनसेच्या सभांसाठी ओळखलं जाणारं शिवाजी पार्काचं मैदानातून काँग्रेस महापालिकेचं रणशिंग फुंकणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.