1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 नोव्हेंबर 2022 (15:02 IST)

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांचा पाऊस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये 'कव्वाली नाईट' आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळले. विशेष म्हणजे याआधीही जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैशांची उधळपट्टी झाली होती. त्यावेळीही जलील यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.
 
खासदार जलील यांच्याकडून शुक्रवारी आमखास मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कव्वाली सुरु होताच समर्थकांनी जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे.  

खासदार जलील यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत. या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेटी देत आहेत. शुक्रवारी कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कव्वाली सुरु होताच समर्थकांनी जलील यांच्यावर अक्षरशः नोटा उडवल्यात.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor