रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (07:57 IST)

पुढील पाच दिवसात ‘या’ 5 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनने दडी मारली आहे. मात्र, आता महाराष्ट्रात मान्सूनसाठी  पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार  पावसाची शक्यता हवामान विभागाकडून  वर्तवण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर विदर्भात म्हणावा असा पाऊस पडला नव्हता. मात्र, आता मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
पुढील पाच दिवस राज्यात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट  दिला आहे. त्यामुळे 29 ऑगस्टपर्यंत पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
 
चालू महिन्यामध्ये मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडला नाही.त्यामुळे मराठवाड्यासह आसपासच्या परिसरातील शेतकरी चेंतेत पडले आहेत.
मराठवड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ आणि अशंत: ढगाळ हवामानाची नोंद करण्या येत आहे.पण याठिकाणी पाऊस मात्र पडत नाही.
मात्र आज मराठवाड्यात सर्वत्र विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.मुंबई वेधशाळेनं आज औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांना इशारा दिला आहे.