मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (20:50 IST)

पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा अलर्ट

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली होती मात्र राज्यात पुन्हा पावसाने कमबॅक केलं आहे. काल राज्याच्या बऱ्याच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावलीय. आता आजही राज्यांतल्या  काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात यलो तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
राज्यातला पावसाचा मुक्काम वाढला आहे. शनिवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार आहे. म्हणजेच आणखी दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने पिकांना जीवदन मिळालं आहे. धुळे नंदूरबार, नाशिक जिल्ह्यांतही जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, नांदेड उस्मानाबादसह विदर्भातील जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहिल, त्यानंतर पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.