1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 25 जुलै 2022 (17:03 IST)

महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती

rain
राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज देण्यात आला आहे. तसेच ठाण्यासह उपनगरात पावसानं थोडी उसंत घेतली आहे. मात्र आज विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
 
विदर्भ, मराठवाड्यासह काही नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वा-यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथे यलो अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय उर्वरीत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.
 
चंद्रपूर -गडचिरोली मार्गावर पाणी असल्यानं हा मार्ग प्रवासासाठी बंद आहे. तरीही पर्यटनाला आलेले हे महाशय याच पाण्यातून फिरत फिरत चालले होते.