गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:43 IST)

पावसाचा दगा…शेतकऱ्याचे पीक वाचविण्यासाठी धडपड

Farmers struggle to save their crops due to low rain
जळगाव  सध्या जिल्ह्यातील विविध भागांत कोळपणी, डवरणीच्या कामाला गती दिली जात असली तरी मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. पावसानं दडी मारल्यानं खरीप हंगाम संकटात आला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
 
ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी, उडी, मुंग, तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी बरसल्या तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने पिकं माना टाकत असून पिकांची वाढ खुंटली आहे.
 
सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीय.मात्र, आता पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. लवकर पावसाच्या सरी बरसल्या नाही तर पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्याने पेरणी केली मात्र तो अंदाज फोल ठरला. आता हे शेतकरी आपलं पीक वाचविण्यासाठी धडपड करत आहेत.