संबंधित माहिती
- उद्धव सरकार कोसळल्यानंतर राज ठाकरेंनी दिली ही जबरदस्त प्रतिक्रीया
- फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन
- बंडखोरांसमोर नवा पर्याय? एकनाथ शिंदेंनी केला राज ठाकरेंना दुसऱ्यांदा फोन
- राज ठाकरे यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
- शिंदे 49 आमदारांसह दिसले; राऊत म्हणाले- शिवसेना युती सोडण्यास सहमत, मुंबईत येऊन चर्चा करा
राज ठाकरे यांचा सुचक सल्ला, म्हणाले आपण तरी बेसावध राहू नका
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्राचे 20 मुख्यमंत्री ठरले आहेत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरून त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना एक सुचक सल्लाही दिला आहे.
असे आहे राज ठाकरे यांचे ट्विट
एकनाथ शिंदेजी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन, खरचं मनापासून आनंद झाला, नाशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल ही आशा. अशा शब्दात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. यापुढे राज ठाकरे यांनी त्यांना सुचक सल्ली देत लिहिले की, आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे पावले टाका, पुन्हा एकदा आपले अभिनंदन.
