मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (09:14 IST)

राज ठाकरे 21 सप्टेंबरपासून फेसबुकवरुन भेटीला

raj-thackeray-to-entry-on-facebook-teaser-launched

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 21 सप्टेंबरला फेसबुकवरुन भेटीला येणार आहेत. घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे फेसबुकवर एन्ट्री घेत आहेत. राज ठाकरेंच्या फेसबुक एन्ट्रीचा टीझर नुकताच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन लॉन्च करण्यात आला आहे.

“व्यंगचित्रांचे ठाकरी फटकारे अन् दांभिकतेवर गरजणारी ‘राज’गर्जना आता फेसबुकवर” असे टीझरच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.  घटस्थापनेच्या दिवशी दादरमध्ये खास कार्यक्रमात राज ठाकरेंच्या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात येणार आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे तरुणांशी थेट जोडले जाणार आहेत.