बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 डिसेंबर 2022 (20:51 IST)

राजू पाटील म्हणतात, ‘वरच्या मजल्यावर’घनदाट ‘अंधार’आहे

raju patil
Twitter
आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोचरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी सुषमा अंधारेंना सुशी ताई म्हटलं आणि ‘वरचा मजला रिकामा’या मराठी वाक्प्रचाराचा वापर करत टीका केली. त्यांनी शनिवारी  ट्वीट करत ही टीका केली. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही हे ट्वीट रिट्वीट करण्यात आलं आहे.
 
राजू पाटील म्हणाले, “मराठीत ‘वरचा मजला रिकामा’असा वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक ‘सुशी ताई’आहेत ज्यांच्या ‘वरच्या मजल्यावर’घनदाट ‘अंधार’आहे.”आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात,” अशी टीका राजू पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor