संबंधित माहिती
- आजपासून महाराष्ट्रात 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपद भूषवणार
- LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू
- पुण्यात पुन्हा हिट अँड रन, SUV कारची सहा वाहनांना धडक
- 'लाडकी बहीण योजनेत पैसा वाढणार' मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- शपथविधीनंतर फडणवीस यांची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक
उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Union Minister Ramdas Athawale News: गुरुवार म्हणजे काल भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होते. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री निवडण्यासाठी थोडा वेळ लागला. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यात काहीशी नाराजी होती, पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले आहे. एकनाश शिंदे यांची महायुतीमध्ये नितांत गरज होती आणि हे त्यांना समजले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे, अशी भाजपची भूमिका होती एकनाथ शिंदे यांनी मानले आहे. 7 आणि 8 डिसेंबरला सर्व आमदार शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, असे त्यांनी सांगितले. 7 आणि 8 डिसेंबरला सर्व आमदार शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.#WATCH | Mumbai | Union Minister Ramdas Athawale says, "Eknath Shinde has accepted his post as Deputy CM...It was the BJP's stand that they should get the opportunity now (for the CM post). Eknath Shinde has accepted that. All the MLAs will take oath on 7th and 8th December..."… pic.twitter.com/OKQyEv4Qi0
— ANI (@ANI) December 5, 2024
Edited By- Dhanashri Naik
