मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2016 (09:30 IST)

रावसाहेब दानवे यांना निवडणूक आयोगाची नोटीस

रावसाहेब दानवे यांना निवडणूक आयोगाची नोटीस
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पैठणमधील सभेतील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात पैठणमध्ये रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली होती. त्यावेळी प्रचारसभेत बोलताना “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.” असे वादग्रस्त वक्तव्य दानवे यांनी केलं होते.