मंगळवार, 11 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 सप्टेंबर 2018 (08:45 IST)

कोल्हापूर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा संविधान बचावचा नारा

- महिला पदाधिकाऱ्यांवर धावून आले पोलिस
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात संविधान बचाव मोहीम छेडली आहे. आज कोल्हापुरात या अभियानाची जनजागृती करण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करत मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांवर प्रचंड दडपशाही केली. पोलीस चक्क महिला पदाधिकाऱ्यांवर धावून जाताना दिसले.
 
सरकार मनुस्मृती आणि मनुविचारांचे संरक्षण करत आहे. या सरकारला संविधान नको तर मनुस्मृती हवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी दिली. हे सरकार मनुवादी असून संविधानविरोधी आहे. या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार विद्या चव्हाण यांनी दिली.