गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सेक्स नाही तर विवाह रद्द

बॉम्बे हायकोर्टाने एका जोडप्याचे विवाह रद्द केले कारण त्यांच्यात नऊ वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते. तसं तर महिला धोक्याने लग्न केल्यामुळे विवाह रद्द करू इच्छित होती.
 
जस्टिस मृदुला भाटकर यांनी कोल्हापूरच्या एका जोडप्याची नऊ वर्षापासून सुरू असलेली कायद्याची लढाई विवाह रद्द केल्यावर संपली. महिलेचा आरोप होता की स्वत:ला तिचा पती म्हणवणार्‍याने धोक्याने तिची सही घेऊन लग्न केले.
 
वर्ष 2009 च्या या प्रकरणात 21 वर्षीय महिलेचा दावा आहे की तिच्याकडून रिकाम्या कागदावर सही घेतली गेली आणि रजिस्ट्रार समोर लग्न करण्यात आले. तसे कोर्टाने महिलेचे आरोप नाकारले कारण कोर्टाला याबाबत पुरावे मिळाले नाही. परंतू लग्न मोडण्यामागे मुख्य कारण ठरले म्हणजे हे की त्यांच्यात मागील 9 वर्षांपासून शारीरिक संबंध नव्हते.
 
जस्टिस भाटकर यांनी म्हटले की लग्न एक महत्त्वपूर्ण असून यात दोघांमध्ये शारीरिक संबंध नसल्यास लग्नाला अर्थच नाही. लग्नानंतर केवळ एकदाच संबंध बनले असतील तरी विवाह रद्द केलं जाऊ शकतं.