मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (21:17 IST)

राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे - शीतल म्हात्रे

sheetal mahtre
Twitter
शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपलेच असल्याचा दावा हे दोन्ही गट करतात. निवडणूक आयोग याबाबत काय निकाल देतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बंडखोरी केलेल्यांना लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केले होते, असे असा दावा आहे. राऊतांच्या याच दाव्यावर आता शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
 
“आज महाज्ञानी, महावक्ता संजय राऊत यांनी एक आकाशवाणी केली. मी शीतल म्हात्रे मागील १८ वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊत म्हणाले की माझ्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटीला गेले. हसावे की रडावे हेच मला समजत नाही. मी आमदार नाही किंवा खासदारही नाही. मी फक्त एक माजी नगरसेवक आहे. माझ्या बोलण्याला घाबरून आमदार पळून गेले, असे म्हणणे लहान मुलांनाही पटणारे नाही,” असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor