मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (08:05 IST)

राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार : जयंत पाटील

“दिल्लीतल्या सरकारच्या विरोधात जे, जे बोलत आहेत, त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतं. घटनाक्रम बघितला तर ते लक्षात येईल. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला बदनाम करणं, त्रस्त करुन सोडणं हा प्रयत्न काही जण करतायत. हे देशातल्या जनतेला कळलं आहे” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील म्हणाले.
 
वर्षभरापासून सरकार पाडण्यासाठी ईडी आणि वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यावर जयंत पाटील यांनी “राऊतसाहेब बोलले म्हणजे तथ्य असणार. ते खरं आहे” असे उत्तर दिले.