गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. प्रजासत्ताक दिन
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2024 (11:44 IST)

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस : महाभारत आणि बौद्ध काळात पण लोकतंत्र होते का?

Republic Day 2024 : 26 जानेवारी 1950 ला भारतात प्रजासत्ताक दिवस घोषित केला. 1947 पूर्व भारतात इंग्रजांचे शासन होते. त्या पूर्वी भारतात खूप राजवाडे वेगळे होऊन त्यावर राजांचे शासन होते. पण प्राचीन काळापासून तर मध्य काळाच्या सुरवात पर्यंत भारतात काही राज्य प्रजासत्ताक राहिले आहे. चला जाणून घेऊ या की महाभारत काळात आणि बौद्ध काळात प्रजासत्ताक होते का नाही?
 
महाभारत काळात प्रजासत्ताक : 
* शूरसेन आणि व्दारका : महाभारत काळात 16 महाजनपदांचा उल्लेख मिळतो. महाभारत काळात प्रमुख रूपाने 16 महाजनपद आणि 200 जनपद होते. पूर्वकथित 16 महाजन पदांच्या अंतर्गत छोटे जनपद पण होते. तसेच पूर्वकथित मध्ये राजशाही किंवा हूकूमशाही होती. मगध जनपद मध्ये हूकूमशाहीचा इतिहास आहे परंतू पूर्वकथित सगळ्यामध्ये शूरसेन जनपदचा इतिहास प्रजासत्ताकच राहिला आहे. मध्येच कंसच्या शासनने या जनपदच्या प्रतिमेला खराब केले होते याच बरोबर श्रीकृष्ण यांनी व्दारकेची स्थापना केली होती. त्यांचे राज्य हे जनतेला महत्व दयायचे.  
 
* महाभारतात लोकतंत्रचे सूत्र : महाभारतात पण लोकतांत्रिक व्यवस्थेचे सूत्र मिळतात. महाभारतात जरासंध आणि त्यांचे सहयोगी यांचे राज्य सोडले तर सगळ्या राज्यांमध्ये प्रजासत्ताकला महत्व दिले जायचे. महाभारत काळात शेकडो राज्य होते आणि त्यांचे राजा होते. ज्यात काही छोटे होते तर काही मोठे, काही सम्राट असल्याचे सांगायचे तर काही हूकूमशाही करून अत्याचार करायचे. काही असभ्य लोकांची टोळी पण होती की ज्यांना राक्षस म्हटले जायचे. पण जे राज्य महर्षि पराशर, महर्षि वेद व्यास यांसारख्या लोकांच्या उपदेशाने चालायचे तिथे प्रजासत्ताक व्यवस्था होती. महाभारतात अंधकवृष्णियांचा संघ प्रजासत्ताक होता.
 
'यादवा: कुकुरा भोजा: सर्वे चान्धकवृष्णय:,
त्वय्यासक्ता: महाबाहो लोकालोकेश्वराश्च ये।
'भेदाद् विनाश: संघानां संघमुख्योऽसि केशव'
महाभारत शांतिपर्व 81, 25 / 81, 29
 
वृष्णियांचा तसेच अंधकांचा पुराणांमध्ये उल्लेख मिळतो. वृष्णि प्रजासत्ताक शूरसेन प्रदेश मध्ये स्थित होते. या प्रदेशाच्या अंतर्गत मथुरा आणि शौरिपुर हे दोन प्रजासत्ताक राज्य होते. अधकांचे प्रमुख उग्रसेन होते जे आहुकचे पुत्र आणि कंसचे पिता होते. दुसरीकडे शूरसेनचे पुत्र वासुदेव होते जे वृष्णियांचे मुखिया होते वृष्णि व अंधक या दोन राज्यांना मिळवून एक संघ बनवला गेला होता ज्यांचा प्रमुख राजा उग्रसेनला बनवले होते. या संघीयराज्यात वंश या परंपराचे शासन नव्हते तर वेळेनुसार जनतेने निवडलेले प्रतिनिधित्व होते. आपत्कालीन किंवा यद्धकाळात मध्येच सत्तेत बदल व्हायचा.
 
* बौद्ध काळात प्रजासत्ताक : महाभारत काळात अंधकवृष्णियांच्या प्रजासत्ताक संघनंतर बौद्ध काळात (450 ई.पू. ते 350 ई. ) मध्ये चर्चित प्रजासत्ताक होते जसे की पिप्पली वनाचे मौर्या, कुशीनगर आणि काशीचे मल्ल, कपिलवस्तुचे शाक्य, मिथिलाचे विदेह आणि वैशालीचे लिच्छविचे नाव प्रमुख रुपाने घेतले जायचे. यानंतर अटल, अराट, मालव आणि मिसोई नावाच्या प्रजासत्ताक राज्यांचा पण उल्लेख केला जातो. बौद्ध काळात वज्जी, लिच्छवी, वैशाली, बृजक, मल्लक, मदक, सोमबस्ती आणि कम्बोज यांसारखे प्रजासत्ताकसंघ लोकतांत्रिक व्यवस्थेचे उदाहरण आहे. वैशालीचे पहिले राजा विशाल यांना लोकमताने म्हणजेच मतदानने निवडले होते. 
 
भगवान महावीर आणि बौद्धांच्या वेळी उत्तर पूर्व भारत प्रजासत्ताक राज्यांचे प्रधान क्षेत्र होते आणि लिच्छवी, विदेह, शाक्य, मल्ल, कोलिय, मोरिय, बुली आणि भग्ग त्यांचे मुख्य प्रतिनिधि होते. साधारण सहाव्या शताब्दीमध्ये ईसा पूर्व नेपाळच्या तराई पासून गंगाच्यामध्ये पसरलेल्या भूमिवर वज्जियों तसेच लिच्छवीचे संघ (अष्टकुल) व्दारा प्रजासत्ताक शासनची व्यवस्था सुरु केली होती. येथील शासक हा जनतेच्या प्रतिनिधित्व व्दारा निवडला जायचा.
 
विष्णुपुराण अनुसार इथे कमीतकमी 34 राजांनी राज्य केले होते. पहिले नभक आणि शेवटचे सुमति होते. राजा सुमति भगवान राम यांचे पिता राजा दशरथ यांचे समकालीन होते.
 
* चाणक्य यांच्या उपदेश : कौटिल्य आपल्या अर्थशास्त्रात लिहतात की, गणराज्य 2 प्रकारचे असतात, पहिला अयुध्य गणराज्य म्हणजे असे गणराज्य की त्यात फक्त राजाच निर्णय घेईल, दूसरा आहे श्रेणी गणराज्य ज्यात प्रत्येकजण भाग घेऊ शकतो.
 
* पाणिनी यांचा उपदेश :  कौटिल्य यांच्या पहिले पाणिनी यांनी काही गणराज्यांचे वर्णन आपल्या व्याकरणात केले आहे. पाणिनी यांच्या अष्टाध्यायमध्ये जनपद शब्दाचा उल्लेख अनेक ठिकाणी केला आहे, ज्यांची शासनव्यवस्था जनता व्दारा निवडलेल्या प्रतिनिधींच्या हातात राहत होती. 
 
* यूनान : यूनानने भारताला पाहूनच गणराज्यांची स्थापना केली होती. यूनानचे राजदूत मोगास्थनीज यांनी आपल्या पुस्तकात क्षुद्रक, मालव, शिवि इतर गणराज्यांचे वर्णन केले आहे.
 
* बौद्ध ग्रन्थ : बौद्ध ग्रन्थ अंगुत्तर निकाय, महावस्तुच्या अनुसार बौद्धकाळात जनपद होते. अंग, अश्मक, अवंती, चेदि, गांधार, काशी, काम्बोज, कोशल, कुरु, मगध, मल्ल, मत्स्य, पांचाल, सुरसेन, वज्जि आणि वत्स यांत अवंतीकाचे राजा विक्रमादित्य यांचे राज्य सगळ्यात मोठे प्रजासत्ताक होते. यानंतर राजा हर्षवर्धन पर्यंत प्रजासत्ताकचे महत्व राहिले. नंतर भारतात जेव्हा अरब, तुर्क, फारस यांचे आक्रमण वाढले तेव्हा परिस्थिति बदलत गेली.