राज्यसभा निवडणूक 2022 : अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं निवडणुकीत भाजपचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. निकालानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले जात आहे. या वर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ''अब देवेंद्र अकेला नही, सारी कायनात उनके साथ है', या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
भाजपच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा, हा विजय सत्याचा आहे. सत्याच्या बाजूने सर्व जण आहे. अब देवेंद्र अकेला नहीं, सारी कायनात उनके साथ है,हा भाजपच्या स्वतःचं कर्तृत्वावरील निकाल आहे. भाजपकडे जे लोक आले ते प्रेमाने आले. भाजपच्या या विजयानंतर शिवसेनेला धडे मिळायला सुरु होईल. भाजप काही महाविकास आघाडी नाही रडीचा डाव खेळायला , असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी या निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गाने माणसे आपलीशी केली आणि त्यामुळे त्यांना यश आले.