बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 डिसेंबर 2020 (09:50 IST)

लोणावळ्याला जाण्याआधी वाचा, मगच फिरायला निघा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 25 डिसेंबर ते 05 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेच्या क्षेत्रामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 असा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 
 
पुणे ग्रामीण हद्दीतील पर्यटकांची व नागरिकांची लोणावळा, अॅम्बी व्हॅली लवासा, भूशी डॅम, मुळशी डॅम, ताम्हीणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी तसेच फार्म हाऊस, रिसॉर्ट इत्यादी ठिकाणी नाताळ सण, नववर्षाच्या निमित्ताने मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, तसेच मावळ, मुळशी व हवेली या तालुकयातील संपुर्ण कार्यक्षेत्रामध्ये तसेच शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा, डिग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक 25 डिसेंबर ते दिनांक 05 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11 ते सकाळी 06 पर्यंत जमावबंदी आदेश पारित होणे आवश्यक असल्याचे नमुद केलेले आहे.