1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:44 IST)

जानेवारी महिन्यात 25 हजार शिक्षकांची पदे भरती

Recruitment of 25 thousand
राज्य सरकारने जानेवारी महिन्यात 25 हजार शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकभरतीच्या प्रतीक्षेत असणार्‍यांनाही दिलासा मिळणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांची भरती बंद आहे. मात्र, मराठा आरक्षण लागू झाल्यानेआणि येणार्‍या निवडणुका पहाता या भरतीला आता मुहूर्त सापडला आहे. याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 
राज्यात 1 लाख 78 हजार डीएड, बीएड उमेदवार भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या राज्यभरात हजारांहून शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 70 टक्के शिक्षकभरती स्थानिक स्वराज्य संस्थांत महापालिका तसेच जिल्हा परिषद शाळांत करण्यात येणार आहे. 72 हजारांची मेगाभरती एकाच टप्प्यात होणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आधीच 25 हजार शिक्षकांच्या जागा भरण्याचे जाहीर केले आहे.
 
मराठा समाजालाही या भरतीमध्ये आरक्षण देण्यात येणार असून जानेवारीत ही भरती पूर्ण करण्यात येणार आहे.