शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (16:26 IST)

१ जानेवारी पासून सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लाभ

येत्या १ जानेवारी पासून राज्यात सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लाभ देण्यास सुरुवात करण्यात येईल अशी माहिती अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. सातव्या वेतन आयोगाबाबत के.पी.बक्षी यांची समिती नियुक्त करण्यात आली असून त्यांच्या शिफारसी ५ डिसेंबरपर्यंत येण्याची शक्यता आहे. या समितीच्या शिफारसी आल्या नाही तरी जानेवारीपासून वेतन आयोगाप्रमाणे निश्चितच लाभ देण्याची सुरुवात करण्यात येईल. 
 
सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर किमान वेतन २० हजारच्या पुढे जाईल. निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याबाबत खटूआ समिती अहवालानंतर निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी तारांकित प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.