सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (00:16 IST)

तांब्याची अंगठी घालण्याचे फायदे

ज्योतिष्यात नऊ ग्रह सांगण्यात आले आहे आणि सर्व ग्रहांची वेग वेगळी धातू आहे. ग्रहांचा राजा सूर्य आहे आणि सूर्याची धातू तांबा. हिंदू धर्मात सुवर्ण, चांदी आणि तांबा, ह्या तीन धातू पवित्र मानण्यात आल्या आहेत. म्हणून पूजा पाठात या धातूंचा सर्वात जास्त उपयोग होतो. त्याशिवाय याच्या अंगठ्या देखील बरेच लोक धारण करतात. येथे जाणून घेऊ तांब्याची अंगठी घालण्याचे काय काय फायदे आहेत …
 
1. तांब्याची अंगठी सूर्याचे बोट अर्थात रिंग फिंगरमध्ये घालायला पाहिजे. यामुळे पत्रिकेत असलेले सूर्य दोष कमी होण्यास मदत मिळते.  
 
2. सूर्यासोबतच तांब्याची अंगठीमुळे मंगळाचे अशुभ दोष देखील दूर होण्यास मदत मिळते.  
 
3. तांब्याच्या अंगठीच्या प्रभावामुळे सूर्याचा बळ वाढतो, ज्यामुळे आम्हाला सूर्याच्या कृपांमुळे घर परिवार आणि समाजात मान सन्मान मिळतो.  
 
4. तांब्याची अंगठी सतत आमच्या शरीराच्या संपर्कात राहते. त्यामुळे तांब्याचे औषधीय गुण शरीराला मिळत राहतात. याने रक्त शुद्ध होत.  
 
5. ज्या प्रकारे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असत, तसेच तांब्याच्या अंगठीमुळे देखील फायदा मिळतो.  
 
6. तांब्याच्या अंगठीच्या प्रभावामुळे पोटाशी निगडित आजारात फायदा होण्यास मदत मिळते.  
 
7. तांबा सतत त्वचेच्या संपर्कात राहतो, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते.  
 
8. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यांचा उपयोग केल्याने आमची रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. हेच मुख्य फायदे आहे तांब्याची अंगठी धारण करण्याचे. 
 
9. तांब्याची अंगठी घातल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहत. त्याशिवाय या अंगठीला धारण केल्याने शरीरावरील सूज कमी होण्यास मदत मिळते.  
 
10. तांब्याची अंगठी धारण केल्याने शरीरातील गरमी कमी होते. हे धारण केल्याने शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच रागावर देखील नियंत्रण राहत. ही अंगठी तन आणि मन दोघांना शांत ठेवण्यास मदत करते.