शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (12:58 IST)

गूगल मॅपवर आले नवीन अपडेट, जाणून घ्या काय आहे त्याचा फायदा

गूगल मॅपमध्ये नवीन अपडेट देण्यात आले आहे, ज्यांच्या मदतीने यूजर लाइव्ह लोकेशन आणि बस-ट्रेन यात्रेसाठी ETA (येण्याचे अनुमानित वेळ) शेयर करू शकाल. हे जुन्या लोकेशन फीचरचे अपग्रेड वर्जन आहे. अपडेटसोबत मिळालेला हा नवीन फीचर सध्या एंड्रॉयड डिवाइससाठी जारी करण्यात आला असून लवकरच हा फीचर आयओएस यूजरला देखील मिळेल. ह्या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एंड्रॉयड स्मार्टफोनमध्ये उपस्थित गूगल मॅप्सला गूगल प्लेस्टोरवर जाऊन अपडेट करावे लागणार आहे.  
 
ही माहिती फक्त गूगल कॉन्टॅक्ट नव्हे तर थर्ड पार्टी एप Facebook Messenger आणि  WhatsAppवर देखील शेअर करू शकता. बस आणि ट्रेन ट्रिपला शेअर करण्यासाठी सर्वात आधी गंतव्य जागेला सेट करा आणि नंतर ट्रांजिट टॅबमध्ये जा. लिस्टमध्ये योग्य रूटसाठी नेविगेशनला एक्टीवेट करा आणि नंतर खाली उजवीकडे दिलेल्या 'शेयर ट्रीप प्रोग्रेस' बटणाला क्लिक करा.