शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (16:33 IST)

पुण्यात गुगलचे ‘नेबरली’ अ‍ॅप दाखल

पुणे शहरात गुगलकडून २७ नोव्हेंबरपासून ‘नेबरली’ हे अ‍ॅप दाखल केले जाणार असून, त्यामुळे शहरातील अँड्रॉईड मोबाइलधारकांना स्मार्ट शेजार मिळणार आहे. नेबरली अ‍ॅपची सुविधा मिळणारे पुणे हे देशातील सातवे शहर आहे. मुंबई, जयपूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, म्हैसूर, कोची आणि कोईमतूर या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
 
मुंबई येथे हे अ‍ॅप दाखल केल्यानंतर पावसाळय़ातील पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी, उत्सवाच्या काळात रस्त्यांवरील रहदारीची माहिती घेण्यासाठी या अ‍ॅपचा वापर बहुसंख्य नागरिकांनी केल्याचे आढळून आले. अ‍ॅपद्वारे प्रश्न विचारून  सुमारे एक ते पाच किलोमीटरच्या परिघातील व्यक्तींकडून माहिती मिळवणे शक्य आहे. ही सुविधा मोफत असून माहिती प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक माहिती भरणे, स्वत:चे छायाचित्र वापरणे बंधनकारक नाही.