शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

गूगल पुढील महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो

गूगलने नुकतेच त्याचे फ्लॅगशिप स्मार्टफोन गूगल पिक्सेल 3 आणि पिक्सेल 3 एक्सएल लॉन्च केले होते आणि कंपनी आता मिड रेंज बाजारावर लक्ष केंद्रित करून आहे. टेक वर्ल्डच्या मते, गूगल पुढच्या महिन्यात नवीन मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो. आतापर्यंत गूगल द्वारा या माहितीची पुष्टी केली गेली नाही आहे. परंतु गूगल बोनिटो नावाच्या मिड रेंज सेगमेंटवर कार्य करत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनिटोसह सारगोचे देखील नाव पुढे आले आहे. 
 
टेक वर्ल्डच्या मते, गूगल फोनच्या मिड रेंज स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 ची चिपसेट वापरली गेली आहे. तथापि, त्याच्या डिस्प्ले आणि कॅमेर्‍याबद्दल अद्याप जास्त माहिती उपलब्ध नाही आहे. एका अंदाजानुसार, गूगलच्या या फोनची किंमत 20,000 रुपये ते 35,000 रुपये असू शकते.