रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (16:00 IST)

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत गडकरी म्हणतात मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न

nitin
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास आम्ही त्यांना साथ देऊ, असं विधान अलीकडेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. यावर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचा स्वयंसेवक आहे. मी आयुष्यभर माझ्या विचाराप्रमाणे काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
 
काँग्रेसकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत स्पष्टीकरण देताना नितीन गडकरी म्हणाले की, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी माझ्या विचारांसाठी राजकारणात आलो. त्यामुळे माझ्या विचारधारेशी प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता मला कुणी आमंत्रण द्यावं किंवा कुणी काय बोलावं? हा त्यांचा प्रश्न आहे. पण जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत माझी संघटना, माझा पक्ष आणि माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता आहे. त्यामुळे मी माझ्या सिद्धांताप्रमाणे आणि विचाराप्रमाणे आयुष्यभर काम करेन, याबाबत माझ्या मनात स्पष्टता आहे, असं स्पष्ट विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.