रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 सप्टेंबर 2021 (08:26 IST)

बाळ बोठेच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. बोठे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी त्याचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान बोठे याच्यातर्फे ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील आणि ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता.
 
सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. उमेशचंद्र यादव पाटील म्हणाले की, जामीन मिळाला तर आरोपी फरार होऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने 100 पेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता. आरोपीचे वर्तन लक्षात घेत त्याला जामीन देऊ नये, असं ॲड. यादव यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, बदनामी होण्याच्या भितीतून बाळ बोठे याने सुपारी देऊन 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बोठे सध्या पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कस्टडीत आहे. दरम्यान, बाळ बोठे याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे.