बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (16:07 IST)

कोल्हापुरात येत्या २७ जूनपर्यंत लागू असलेले निर्बंध कायम

कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्यापलेली संख्या याचे प्रमाण या आठवड्यातही कमी झालेले नाही. यामुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या श्रेणीत राहिला असून पुढील आठवड्यातही २१ जून ते २७ जून अखेरपर्यंत लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होणार आहे.
 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात पॉझिटिव्हिटीचे वाढते प्रमाण कायम असल्याने प्रशासन चिंतेत आहे. जिल्ह्यांतील काही गावांत कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत चढ-उतार कायम आहे. गुरुवारी १३८३ नवे रुग्ण आढळले तर १४१० जण कोरोनामुक्त झाले. तर बाधित ३९ जणांचा मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील ३३७ जणांना संसर्ग झाला आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ११,३६१ झाली आहे.