1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (12:05 IST)

RIP रंगनाथ वाणी : माजी आमदार रंगनाथ वाणी यांचे निधन

RIP Ranganath Vani: Former MLA Ranganath Vani passed away Maharashtra News Regional Marathi News
वैजापूर शिवसेनेचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर वाणी यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले.ते 84 वर्षाचे होते.वाणी यांचे पार्थिव देह सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे.नंतर त्यांचे अंत्यसंस्कार वैजापूर मुक्तिधाम मध्ये केले जाणार आहे.त्यांच्या निधनानं सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.वाणी हे अभ्यासू पत्रकार, संपादक,नगराध्यक्ष आणि माजी आमदार म्हणून ओळखले जायचे.त्यांना जनकल्याणाची आवड होती.त्यांनी महाराष्ट्र विधानसभा असताना जनकल्याणाचे अनेक प्रश्न सभागृहात मांडले होते.